वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, PM- USHA योजनेअंतर्गत मराठी
विभागाच्या वतीने 'मुद्रितशोधन' प्रमाणपत्र कोर्स दि.५ फेब्रुवारी २०२६ (दररोज: दुपारी ३.०० ते ४.३०) पासून सुरू
करण्यात येत आहे. पूर्ण कोर्स ३० तासांचा असेल.
सदरील कोर्ससाठी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार असून, या कोर्ससाठी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी
प्रवेश घेऊ शकतो. कोर्ससाठी फीस नाही.
प्रवेश मर्यादित असून कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.
१) स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
२) उत्तरलेखनाची व विचारांची भाषा सुधारते.
३) लेखनातील चुका टाळता येतात.
४) प्रमाण मराठी लेखनाचा अभ्यास होतो.